नियती श्रीधर तिळवे नाईक मागील लेखात नरेंद्र मोदींच्या अंगाने काही चर्चा केली. या निवडणुकीत मीडियामध्ये अत्यंत व्यापक प्रमाणावर भविष्यविज्ञानाच्या एका शाखेची चर्चा झाली, ती म्हणजे निवडणूक भाकीतशास्त्र. ती शाखा भविष्यविज्ञानातील निकालशास्त्राची एक उपशाखा आहे. गेली काही वर्षे निवडणुकांचे अचूक भविष्य सांगण्यामुळे तिला हळूहळू प्रतिष्ठाही प्राप्त झाली आहे. भविष्यविज्ञानाची अशीच दुसरी शाखा म्हणजे, हवामान भाकीतशास्त्र. भारतामध्ये इसवि सन 2005पर्यंत ही शाखा म्हणजे चेष्टेचा विषय होता. भारतात भविष्यविज्ञानाची जी काही प्रतिष्ठा आहे, ती या दोन शाखांमुळे आहे. इतर शाखांत भारतात अजून पुरेसे काम झालेले नाही. वास्तविक भारतामध्ये टोळीय समाजापासूनच भविष्याचे निदान करण्याचा छंद भारतीयांना लागला होता. टोळीय समाजात ज्याला आज आपण शकुनशास्त्र म्हणतो, ते विकसित व्हायला सुरुवात झाली. अर्थातच हे शास्त्र अंधश्रद्धेवर आधारित असल्याने, त्याला आज प्रतिष्ठा नाही. परंतु भविष्यविज्ञानाचा पाया भारतात ज्या काही गोष्टींनी घातला, त्यात शकुनशास्त्राचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या शकुनशास्त्राचा सर्वाधिक प्रभावी वापर ह...
Posts
- Get link
- X
- Other Apps
अभिजात मराठीत अभिजात कलाकृती का निर्माण होत नाहीत श्रीधर तिळवे नाईक कुठलीही भाषा अभिजात होण्यासाठी तिच्यामध्ये अभिजात साहित्य निर्माण होणे फार आवश्यक असते साहजिकच मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या अंगाने काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यातील एक प्रश्न म्हणजे मराठीमध्ये अभिजात कलाकृती का निर्माण होत नाहीत हा आहे माझ्या मते हा एक फार मोठा गैरसमज आहे आणि तो खुद्द मराठी लोकांच्यातच आहे अभिजात भाषेचा विचार करताना अनेकांनी अत्यंत जाणीवपूर्वक आपला वैष्णव अजेंडा पुढे ढकललेला आहे त्यामुळेच कवितेची सुरुवात ज्ञानेश्वर पासून आणि कद्याची सुरुवात चक्रधरांच्या पासून करणारे अनेक महाभाग येथे झालेले आहेत प्रत्यक्षामध्ये मराठीमध्ये आद्य साहित्य हे शैव आहे हालाची गाथासत सई आणि गुणाढ्यची बृहत्कथा (कथासरित्सा सागर) हे दोन आद्यग्रंथ शैव आहेत आणि त्यामुळेच कविता आणि कथा हे दोन वांग्मय प्रकार हे मराठीचे आद्य वाङ्मय प्रकार आहेत असे दिसते भले मग भालचंद्र नेमाडे काय पण म्हणोत कथा हा मराठीचा एक सर्वश्रेष्ठ वांग्मय प्रकार आहे हे आपण मान्य केले पाहिजे आणि त्याला अत्यंत खोल परंपरा आहे ज्याचा पुरावा म...
- Get link
- X
- Other Apps
प्रतिमा , प्रतिमावाद आणि मराठी साहित्य श्रीधर तिळवे नाईक गेली काही वर्षे फेसबुकवर सतत कवितेतील प्रतिमांची चर्चा होत असते मात्र खोलात जाऊन कुणी हा प्रतिमाविचार कुणी तपासताना दिसत नाही काही जण सुधीर रसाळ ह्यांच्या कविता आणि प्रतिमा ह्या ग्रंथाचा उल्लेख करतात जो योग्यच आहे मराठीत सत्यकथेने प्रतिमवाद आणला कारण तो पाश्चात्य साहित्यात तसा आणला गेला व नवीन प्रतिमा म्हणजे नवता असा काहीसा विपर्यास त्यातून उदयाला आला आणि त्याला देशीवाद्यांनी मर्ढेकरांना जबाबदार मानले कारण त्यांनी प्रतिमाविचार कवितेची चिकित्सा करताना वापरला होता मराठीच्या इतिहासाचा विचार करता मराठीत प्रतिमांचा नीट विचार प्राचीन साहित्याच्या अंगाने होणे अपरिहार्य होता आणि तसा तो प्रथम रा श्री जोग ह्यांनी त्यांच्या १९५२ च्या ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती ह्या ग्रंथात मांडला पारंपरिक आर्य संस्कृत साहित्यशास्त्रात उपमा व रूपक ह्यांचा विचार झाला असला तरी प्रतिमेचा विचार तितका खोल झाला न्हवता ही उणीव भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता व त्यासाठी त्यांनी सी डे लेविस व एज्रा पाऊंड ह्या आधुनिक कवी लेखकांचा प्रतिम...
- Get link
- X
- Other Apps
भामह हा एक विलक्षण समीक्षक होऊन गेला त्याने कवींच्या चार कॅटेगिरीज दिलेल्या आहेत पहिली कॅटेगिरी कुकवी म्हणजे वाईट कवींची आहे दुसरी कॅटेगरी ही अंध सारस्वत कवींची आहे हे लोक दुसऱ्याचे आंधळे अनुकरण करतात तिसरी कॅटेगरी सतकवींची आहे सतकवी हे त्यांना अनुभवाला येणारे सत्य अत्यंत धाडस करून मांडतात आणि चौथी कॅटेगरी ही सिद्ध सारस्वत कवी ही आहे जिथे कवी काव्यलेखनाची सिद्धी प्राप्त करतो अशा कवींचे लेखन हे स्फुरित होत असते असे तो म्हणतो हे स्फुरणे सहज आणि स्वाभाविक असते त्यात मेहनत नसते अर्थात शेवटची तो सांगत नाही ती आहे सिद्ध कवीची म्हणजे ज्याला मोक्ष अथवा निर्वाण प्राप्त झाले आहे असा कवी ! त्याच्याही काळात तो दुर्मिळ असल्याने कदाचित त्याने उल्लेख केला नसावा मात्र कवी लोकांनी किमान सिद्ध सारस्वत बनावे अशी माझी अपेक्षा आहे श्रीधर तिळवे नाईक
- Get link
- X
- Other Apps
ना धो महानोर ,निसर्ग अन सौंदर्य श्रीधर तिळवे नाईक केशवसुतांनी सौन्दर्यवाद सुरु केला असं म्हंटल जातं प्रत्यक्षात त्यांनी फुल्यांचा सुधारणावाद अन युरोपियन सौन्दर्यवाद ह्यांचा मिलाफ केला त्यांनी वेदांताशी हितगुज केले मराठी कवितेत पुरोगामी व्यक्तिवाद रुजवला पण ते कधीही निसर्गाशी एक होऊ शकले नाहीत मात्र महात्मा फुल्यांच्या कविता ग्रामीण कवितेचा आरंभबिंदू असला तरी सौन्दर्यवादात केशवसुतांची एक खेडे ही कविता आरंभ मानली जाते केशवसुत ह्यांना निसर्गाशी एक होता आले नाही तरी बालकवींना ही किमया औदूंबर कवितेत साधली मग माधव ज्युलियन वैग्रे आले त्यापूर्वी चंद्रशेखरांचे काय हो चमत्कार हे खंड्काव्याही महत्वाचे ! हा मार्गी मराठी सौन्दर्यवाद बहरला तो आरती प्रभू व ग्रेस ह्यांच्यात ! ह्या मार्गी सौन्दर्यवादाला छेद देणारी देशी मराठी सौन्दर्यवादाची परंपरा आपल्याकडे सुरु केली ती पु शि रेगे सुगी लिहणारे ग ल ठोकळ व बा भ बोरकर ह्यांनी ! मात्र ह्यांच्यात एक तत्व मिसिंग होते ते म्हणजे कृषितत्व ! ह्यांच्यापैकी कोणीही शेतात न्हवता (ठोकळ काही प्रमाणात अपवाद असावेत ) त्यामुळं ज्यांनी शेतीची ...
पुस्तक परीक्षणे
- Get link
- X
- Other Apps
पुस्तक परीक्षणे वाचाल तर वाचाल श्रीधर तिळवे नाईक गेली काही वर्षे मी मांडत असलेल्या चौथ्या नवतेला धरून अनेक कादंबऱ्या येतायत त्यातील दोन कादंबऱ्या मी वाचल्या पहिली नव्वदोत्तर सुधीर देवरे ह्यांची "मी गोष्टीत मावत नाही " ही आहे अहिराणी भाषेच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या देवरेंनी इथे आत्मपरीक्षणाच्या परखड मायक्रोस्कोपखाली स्वतःला ठेवून आसपासचा माहोल चित्रित केला आहे वास्तव चित्रण आणि चिकित्सा ह्या दोन्ही गोष्टी इथे सतत एकत्र चाललेल्या दिसतात मूल्यव्यवस्था कोसळताना होणारा त्रागा आणि तरीही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणारा नायक इथे सतत प्रयत्नशील राहतो (प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन पुणे ) दुसरी कादंबरी प्रणव सखदेवची चतुर ! त्याला युवा साहित्य अकादमी मिळाल्याने तो आता काय नवे काय लिहिणार असा प्रश्न होता पण त्याने तो सोडवला आहे. .चौथ्या नवतेच्या कादंबरीची सर्व वैशिष्ट्ये ह्या कादंबरीत आढळतात फिक्शन आणि रियॅलिटीचे पुसलेले अंतर डिजिटॅलिक वृत्तांताचे समपर्क वापरण , खुद्द लेखकच नायक असणे आणि तो खरा आहे कि फिक्शन आहे हे शेवटपर्यंत न कळणे अशा अनेक वैशिष्ट्यांनी ही क...