भामह हा एक विलक्षण समीक्षक होऊन गेला त्याने कवींच्या चार कॅटेगिरीज दिलेल्या आहेत 

पहिली कॅटेगिरी कुकवी म्हणजे वाईट कवींची आहे दुसरी कॅटेगरी ही अंध सारस्वत कवींची आहे हे लोक दुसऱ्याचे आंधळे अनुकरण करतात तिसरी कॅटेगरी सतकवींची आहे सतकवी हे त्यांना अनुभवाला येणारे सत्य अत्यंत धाडस करून मांडतात आणि चौथी कॅटेगरी ही सिद्ध सारस्वत कवी ही आहे जिथे कवी काव्यलेखनाची सिद्धी प्राप्त करतो अशा कवींचे लेखन हे स्फुरित होत असते असे तो म्हणतो हे स्फुरणे सहज आणि स्वाभाविक असते त्यात मेहनत नसते अर्थात शेवटची तो सांगत नाही ती आहे सिद्ध कवीची म्हणजे ज्याला मोक्ष अथवा निर्वाण प्राप्त झाले आहे असा कवी ! त्याच्याही काळात तो दुर्मिळ असल्याने कदाचित त्याने उल्लेख केला नसावा मात्र कवी लोकांनी किमान सिद्ध सारस्वत बनावे अशी माझी अपेक्षा आहे


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

पुस्तक परीक्षणे