पुस्तक परीक्षणे

पुस्तक  परीक्षणे 

वाचाल तर वाचाल  श्रीधर तिळवे नाईक 

गेली काही वर्षे मी मांडत असलेल्या चौथ्या नवतेला धरून अनेक कादंबऱ्या येतायत त्यातील दोन कादंबऱ्या मी वाचल्या पहिली नव्वदोत्तर सुधीर देवरे ह्यांची "मी गोष्टीत मावत नाही " ही आहे अहिराणी भाषेच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या देवरेंनी इथे आत्मपरीक्षणाच्या परखड मायक्रोस्कोपखाली स्वतःला ठेवून आसपासचा माहोल  चित्रित केला आहे  वास्तव चित्रण आणि चिकित्सा ह्या दोन्ही गोष्टी इथे सतत  एकत्र चाललेल्या दिसतात मूल्यव्यवस्था कोसळताना होणारा त्रागा आणि तरीही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणारा नायक इथे सतत प्रयत्नशील राहतो (प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन पुणे )

दुसरी कादंबरी प्रणव सखदेवची चतुर ! त्याला युवा साहित्य अकादमी मिळाल्याने तो आता काय नवे काय लिहिणार असा प्रश्न होता पण त्याने तो सोडवला आहे. .चौथ्या नवतेच्या कादंबरीची सर्व वैशिष्ट्ये ह्या कादंबरीत आढळतात फिक्शन आणि रियॅलिटीचे पुसलेले अंतर डिजिटॅलिक वृत्तांताचे समपर्क वापरण , खुद्द लेखकच नायक असणे आणि तो खरा आहे कि फिक्शन आहे हे शेवटपर्यंत न कळणे अशा अनेक वैशिष्ट्यांनी ही कादंबरी गजबजलेली आहे प्रणव हे लिहिताना ओलावा हरवू देत नाही एका व्यक्तीचा इनोसन्सचा होत चाललेला नाश एकाच वेळी हळुवार आणि तटस्थ पद्धतीने ह्यात सांगितला जातो (प्रकाशक : रोहन प्रकाशन ) 

तिसरे रवींद्र इंगळे चावरेकर  ह्याचे सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास हे पुस्तक ! आमच्या पिढीत इतिहासकार काय करतायत हा प्रश्न सतत विचारला जातो त्याला हे काम उत्तर आहे . माझे त्यांच्याशी अनेक मतभेद असूनही मी हे पुस्तक वाचण्याची शिफारस करेन भारतीय लिप्या त्यांची उत्क्रांती त्या मागचे संस्कृतीकारण ह्यांचा अत्यंत खोलात जाऊन लेखकाने मागोवा घेतला आहे चौथ्या नवतेत चिन्ह आणि नेट ह्या गोष्टी केंद्रीय असतात त्यात लिप्याचा रोल अतिशय महत्वाचा असतो इथे चिन्हांच्या दृश्यरूपाचें उत्खनन केलेले आहे आणि त्यानिमित्ताने भारतीय संस्कृतीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला जातो (हस्ताक्षर प्रकाशन  गृह नांदेड )

श्रीधर तिळवे नाईक 

१ मोरया "मोरेश्वर" पाटील निवास एक्सर व्हिलेज एक्सर रोड बोरिवली पश्चिम मुंबई 

मो ९८९२२२९७३० 

आवर्तने चं.  प्र.  देशपांडे 

 चं.  प्र.  देशपांडे ह्यांचे आवर्तने हे एक कविंच्यासाठीही आवश्यक वाचन ह्या कॅटेगरीतील पुस्तक आहे कारण देशीवादाच्या गदारोळात आधुनिक अस्तित्वभान देण्याचा प्रयत्न ते करतं . मराठीत श्रद्धेय परंपरा , काल्पनिक  पुराण व पुरोगामी इतिहास ह्यांची सद्या इतकी झुंबड उडालीय कि मराठीत व भारतातही आधुनिकता शोधणारा एक प्रवाह आहे ह्याचा सगळ्यांना विसर पडलाय मराठीत ही आधुनिकता मर्ढेकरांनी आणली हे सर्वमान्य आहे आणि चं प्र नीं निवडलेल्या कवितांची सुरवात मर्ढेकरांच्यापासून केली आहे त्यांची दिशा इथेच स्पष्ट होते मराठीत विंदा करंदीकर , गंगाधर गाडगीळ , अरविंद गोखले , सदानंद रेगे , प्रभाकर पाध्ये , विलास सारंग , वसंत डहाके ,विजय तेंडुलकर , महेश एलकुंचवार ,  गुरुनाथ धुरी , गुरुनाथ सामंत, वसंत पाटणकर  ह्यासारख्या अनेकांनी आधुनिकता धगधगती ठेवली काही लोक आधुनिकता आणि पुरोगामी रोमँटिसिझम ह्यांच्यात लोम्बकळते राहिले जसे आरती प्रभू (ह्यांनी सर्वांचीच गोची करून ठेवलीये ) ग्रेस व पु शि रेगे ह्यांनी सौन्दर्यवादाचा झेंडा फडफडत ठेवला अनेक आधुनिक कवींची सुरवात रोमँटिसिझमने झाली असली तरी ते पुढे आधुनिक झाले उदा सदानंद रेगे तर दिलीप चित्रे (कविता व ऑर्फियस हा कथासंग्रह शिबा राणीच्या शोधात हे आत्मकथन वा  आत्मकादंबरी )व अरुण कोलटकरांचे (अरुण कोलटकरांच्या कविता ) हे पहिले संग्रह आधुनिक व नंतरचे देशीवादी आहेत 

 चं.  प्र.  देशपांडे हे अस्तित्ववादी आधुनिक धारेत मोडतात व शेवटी ज्याला मी ऍब्सर्ड अस्तित्ववाद म्हणतो तिथे पोहचतात ज्या पॉल सार्त्र , ईंजीन आयनेस्को , सॅम्युएल बेकेट , हेराल्ड पिंटर , अल्बेयर काम्यू , फ्रान्झ काफ्का ह्यासारख्या अनेकांनी ही धारा समृद्ध केली आहे  चं.  प्र.  देशपांडे ह्यांनी ही धारा आत्मसात करत पुढे वाटचाल केली आहे आणि डायलन थॉमसच्या काव्यविचाराची त्यात भर टाकून त्याला एक दिशा दिली आहे 

संपूर्ण पुस्तकात एक गोष्ट जाणवते ती म्हणजे  मराठी आधुनिकता , कविता आणि तिचे खुजेपण हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे ते अतिवास्तववाद व अमूर्तता ह्यांची चर्चा करतात त्यांचा अंतिम निष्कर्ष मात्र मर्ढेकरी आधुनिकवादाला साजेसा आहे मर्ढेकर आधुनिक कलावादी होते तसेच चं.  प्र.  देशपांडे आहेत मात्र मर्ढेकर ऍब्सर्डिटीच्या अमूर्ततेत गटांगळ्या खात नाहीत कदाचित त्यांच्या काळात अशा गटांगळ्या अस्तित्वात नसाव्यात पण  चं.  प्र.  देशपांडे ह्यांच्या पिढीत त्या अस्तित्वात आल्याने  चं.  प्र.  देशपांडे ह्यांना मात्र ह्या गटांगळ्यांच्या खोलात जावेसे वाटले असावे संपूर्ण पुस्तकात एक प्रकारचा रॅन्डमनेस आहे जो अब्सर्ड अस्तित्ववादाला साजेसा आहे एका अर्थाने ही बेकेटियन शैलीची मांडणी आहे पण त्यात अचानक रोमँटिक लोकसुद्धा घुसलेले दिसतात   चं.  प्र.  देशपांडे  ह्यातून वैयक्तिक आवड म्हणून सुटका करून घेतात पण चं.  प्र.  देशपांडे ह्यांना आपण वाचक म्हणून सुटका करून का द्यावी कारण नाही म्हंटले तरी कलावादात हे सर्व बसत असले तरी ते खटकत राहते 

त्यांनी नव्वदोत्तरी कवींचाही केलेला समावेश हा ते अपडेट असल्याचा पुरावा आहे कविता दशकाची ह्या ग्रंथालीच्या पुस्तकातले काही कवी इथे आहेत ज्यांना आजकाल ऐंशोत्तरी म्हंटले जाते संतोष पवार , नितीन वाघ ह्यांच्यासारखे कवी ह्यात नसणे हे खटकते 

काही इन्साईट्स खास  चं.  प्र.  देशपांडे  स्टाईलमधल्या आहेत उदा तुकारामाच्या बीज भाजुनी केली लाही ह्या अभंगांचे त्यांनी केलेले अर्थनिर्णयन ! किंवा कवितेला प्रचार बनवू पाहणाऱ्या प्रचारवाद्यांच्यावर त्यांनी केलेले हल्ले मला त्यांच्या प्रस्तावनेतील सर्वात आवडलेला भाग कवितेची मंत्रशक्ती हा आहे मराठीत भारावून टाकणे ह्या गोष्टीचा विलक्षण गवगवा आहे तिचा भांडेफोड चं प्र नीं छान केला आहे 

माझ्या कवितांचे त्यांनी केलेले अर्थनिर्णयनही मला चकित करणारे वाटले (पॉझिटिव्ह अर्थाने )मी माझ्या कविता लिहितो आणि मोकळा होतो जास्त विचार करत बसत नाही पण तरीही आपल्या कवितेकडे असेही बघता येते हे मला नवीन होते त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो 

एकंदरच पुस्तक नक्कीच किमान एकदा तरी वाचावे असे आहे . वर्णमुद्रां प्रकाशनाची पुस्तके दिसायला देखणी असतात हे पुस्तकही  दिसायला देखणे आहे त्यामुळे एक वाचक म्हणून त्यांचेही आभार 

श्रीधर तिळवे नाईक 

चं.  प्र.  देशपांडे  चं.  प्र.  देशपांडे चं.  प्र.  देशपांडे  चं.  प्र.  देशपांडे  चं.  प्र.  देशपांडे






Comments

Popular posts from this blog