Posts

Showing posts from December, 2022

पुस्तक परीक्षणे

पुस्तक  परीक्षणे  वाचाल तर वाचाल  श्रीधर तिळवे नाईक  गेली काही वर्षे मी मांडत असलेल्या चौथ्या नवतेला धरून अनेक कादंबऱ्या येतायत त्यातील दोन कादंबऱ्या मी वाचल्या पहिली नव्वदोत्तर सुधीर देवरे ह्यांची "मी गोष्टीत मावत नाही " ही आहे अहिराणी भाषेच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या देवरेंनी इथे आत्मपरीक्षणाच्या परखड मायक्रोस्कोपखाली स्वतःला ठेवून आसपासचा माहोल  चित्रित केला आहे  वास्तव चित्रण आणि चिकित्सा ह्या दोन्ही गोष्टी इथे सतत  एकत्र चाललेल्या दिसतात मूल्यव्यवस्था कोसळताना होणारा त्रागा आणि तरीही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणारा नायक इथे सतत प्रयत्नशील राहतो (प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन पुणे ) दुसरी कादंबरी प्रणव सखदेवची चतुर ! त्याला युवा साहित्य अकादमी मिळाल्याने तो आता काय नवे काय लिहिणार असा प्रश्न होता पण त्याने तो सोडवला आहे. .चौथ्या नवतेच्या कादंबरीची सर्व वैशिष्ट्ये ह्या कादंबरीत आढळतात फिक्शन आणि रियॅलिटीचे पुसलेले अंतर डिजिटॅलिक वृत्तांताचे समपर्क वापरण , खुद्द लेखकच नायक असणे आणि तो खरा आहे कि फिक्शन आहे हे शेवटपर्यंत न कळणे अशा अनेक वैशिष्ट्यांनी ही कादंबरी गजबजलेली आहे प्रण