Posts

Showing posts from August, 2023
 ना धो महानोर ,निसर्ग अन सौंदर्य श्रीधर तिळवे नाईक  केशवसुतांनी सौन्दर्यवाद सुरु केला असं म्हंटल जातं प्रत्यक्षात त्यांनी फुल्यांचा सुधारणावाद अन युरोपियन सौन्दर्यवाद ह्यांचा मिलाफ केला त्यांनी वेदांताशी हितगुज केले मराठी कवितेत पुरोगामी व्यक्तिवाद रुजवला पण ते कधीही निसर्गाशी एक होऊ शकले नाहीत मात्र महात्मा फुल्यांच्या कविता ग्रामीण कवितेचा आरंभबिंदू असला तरी सौन्दर्यवादात केशवसुतांची एक खेडे ही कविता आरंभ मानली जाते केशवसुत ह्यांना निसर्गाशी एक होता आले नाही तरी बालकवींना ही किमया औदूंबर कवितेत साधली मग माधव ज्युलियन वैग्रे आले त्यापूर्वी चंद्रशेखरांचे काय हो चमत्कार हे खंड्काव्याही महत्वाचे !  हा मार्गी मराठी सौन्दर्यवाद बहरला तो आरती प्रभू व ग्रेस ह्यांच्यात !  ह्या मार्गी सौन्दर्यवादाला छेद देणारी  देशी मराठी सौन्दर्यवादाची परंपरा आपल्याकडे सुरु केली ती पु शि रेगे सुगी लिहणारे ग ल ठोकळ व बा भ बोरकर ह्यांनी ! मात्र ह्यांच्यात एक तत्व मिसिंग होते ते म्हणजे कृषितत्व ! ह्यांच्यापैकी कोणीही शेतात न्हवता (ठोकळ काही प्रमाणात अपवाद असावेत ) त्यामुळं ज्यांनी शेतीची कामं केलंत त्यांना ह्या